
Lalbaugcha Raja Visarjan
esakal
मुंबईच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या लालबागच्या राजाचे यंदाचे विसर्जन 33 तासांच्या भक्तिमय मिरवणुकीनंतर अखेर गिरगाव चौपाटीवर संपन्न झाले. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या गणपतीच्या विसर्जनाला यंदा अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. समुद्रातील भरती आणि नव्या स्वयंचलित तराफ्यामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे विसर्जन प्रक्रिया लांबणीवर पडली. तरीही, भाविकांचा उत्साह आणि श्रद्धा यामुळे बाप्पाला भक्तीमय निरोप देण्यात यश आले.