लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ 'या' तारखेला प्लाझ्मादान शिबीर आयोजित करणार

कृष्ण जोशी
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

लालबाग चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या आरोग्योत्सवात प्लाझ्मादान शिबीर घेण्यात येणार आहे. तीन ते 31 ऑगस्ट दरम्यान आरोग्योत्सवात याखेरीज अन्य समाजोपयोगी कार्यक्रमही होणार आहेत. 

मुंबई : लालबाग चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या आरोग्योत्सवात प्लाझ्मादान शिबीर घेण्यात येणार आहे. तीन ते 31 ऑगस्ट दरम्यान आरोग्योत्सवात याखेरीज अन्य समाजोपयोगी कार्यक्रमही होणार आहेत. 

एक चूक पडली सव्वा दोन लाखाला; अनोळखी व्यक्तीला 'ओटीपी' सांगण्याची चुक अजिबात करू नका

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त आयोजित या प्लाझ्मादान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते तीन ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता होईल. तर प्लाझ्मादान नोंदणी तेव्हापासून ते 31 ऑगस्टपर्यंत सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत करता येईल. हे शिबीर के. ई. एम. रक्तपेढीच्या सहकार्याने राबवले जाईल. त्याखेरीज गलवान खोऱ्यात हुतात्मा झालेल्या 22 भारतीय सैन्यजवानांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन सत्कारही या आरोग्योत्सवात केला जाईल. 

सावित्री नदीवरच्या पुलाची 'ती' काळी रात्र; 2016 मधील दुर्घटनेच्या आठवणी आजही स्मरणात...

जनतेची सेवा करताना हुतात्मा झालेल्या पोलिस कोविड योद्ध्यांच्या कुटुंबियांनाही देखील एक लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन गौरविले जाईल. तर कोरोनाच्या फैलावात जनतेची सेवा करणाऱ्या विविध कोरोना योद्ध्यांचाही सन्मान केला जाईल. तसेच गणेशचतुर्थी दरम्यान 22 ते 31 ऑगस्ट या दहा दिवसांत सकाळी 10 ते संध्याकाळी पाच या वेळात रक्तदान शिबीरही आयोजित केले जाईल. ही माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

----------------------------------

संपादन - तुषार सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lalbaugraja ganesh mandal will organize a plasma donation camp