करंजेतील रस्तारुंदीच्या भूसंपादनासाठी सूचना - चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 30 मार्च 2017

मुंबई - तारा जिल्ह्यातील करंजी नाका व महालक्ष्मी ते गोडवली रस्त्यांचे काम अपूर्ण आहे. या रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आवश्‍यक जागा सातारा नगर परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाली नाही. भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

सातारा जिल्ह्यातील मोळाचा ओढा ते गोंडाली रस्त्याच्या चौपदीकरणाचे काम अपूर्ण असल्याबाबत सुभाष साबने यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले की, 'मोळाचा ओढा ते गोंडाली रस्त्याच्या कामासाठी 23.20 कोटी रुपयांची मान्यता मिळाली असून, हे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत 21.20 कोटी रुपये या कामावर खर्च करण्यात आला आहे. करंजे गावाच्या रस्त्यांसंदर्भात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन जमीन ताब्यात आल्यानंतर यासाठीचा निधी वितरित करण्यात येईल.''

Web Title: land acquisition Information for karanje road increase