‘व्हिसलिंग वूड्‌स’ला भाडेपट्ट्याने जमीन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

मुंबई - गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘मेसर्स व्हिसलिंग वूड्‌स इंटरनॅशनल लिमिटेड’ या संस्थेस साडेपाच एकर जमीन उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून, भाडेपट्टा कराराने उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई - गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘मेसर्स व्हिसलिंग वूड्‌स इंटरनॅशनल लिमिटेड’ या संस्थेस साडेपाच एकर जमीन उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून, भाडेपट्टा कराराने उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

चित्रनगरीतील महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांनी संयुक्त कराराद्वारे २००० मध्ये ‘मेसर्स व्हिसलिंग वूड्‌स इंटरनॅशनल लिमिटेड’ ही प्रशिक्षण संस्था स्थापन केली होती. त्यानंतर यासंदर्भात झालेल्या वेगवेगळ्या न्यायालयीन प्रकरणे व आदेशांचा विचार करून तसेच कायदेशीर अभिप्राय घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ही संस्था चित्रपट, दूरचित्रवाणी व इतर कला माध्यमांमध्ये दर्जेदार प्रशिक्षण देत आहे. तसेच या संस्थेचे कामकाज हे ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ या अभिमत विद्यापीठामार्फत होत आहे. त्यामुळे ज्या क्षेत्रावर या संस्थेचे बांधकाम उभारण्यात आले आहे, तेवढी साडेपाच एकर जागा या संस्थेला भाडेपट्टा कराराने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, शिक्षण संस्थांना जागा देण्याचे शासनाचे प्रचलित धोरण यास लागू असेल.

मंत्रिमंडळाचे इतर निर्णय
    महाराष्ट्र राज्य पंजाबी साहित्य अकादमीची स्थापना करण्याचा निर्णय.
    गटशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी योजनेत सुधारणा.
    बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) या जोड न्यायालयांऐवजी जिल्हा व सत्र न्यायालय आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मेहकर ही दोन न्यायालये नियमित स्वरूपात कार्यरत करण्यासह पदनिर्मितीस मान्यता.
    जिल्हा परिषदेतील कृषी अधिकारी (गट-क, तांत्रिक) हे पद राज्य शासनाच्या कृषी विभागात गट ‘ब’मध्ये रुपांतरित करून त्याला आता राजपत्रित दर्जा.

Web Title: Land Rental Basis for messrs whistling woods international limited