मुंबईत दरड कोसळून 10 झोपड्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

रात्री पासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला चांगलंच झोडपलं असून जोरदार पावसामुळे असल्फा परिसरातील वाल्मिकी नगरमध्ये झोपड्यांवर दरड कोसळण्याची घटना घडली आहे.

मुंबई : रात्री पासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईला चांगलंच झोडपलं असून जोरदार पावसामुळे असल्फा परिसरातील वाल्मिकी नगरमध्ये झोपड्यांवर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. मात्र घटना घडायच्या आधीच या झोपड्या रिकाम्या केल्याने मोठी दुर्घटना टळली.

असल्फा व्हिलेज जवळील वाल्मीकीनगर झोपडपट्टीवर दुपारी साडेबाराच्या दरम्यान दरड कोसळली. या दुर्घटनेमुळे 10 झोपाड्यांचं नुकसान झालं आहे. रात्री पासूनच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अग्निशमन दल आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या झोपड्यांतील लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केलं होतं. यामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: landslide damages 10 homes in asalfa village at mumbai