esakal | ठाणे - दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे - दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

ठाण्यातील कळवा, घोलाईनगर भागात ही घटना घडली असून दोघांना वाचवण्यात यश आलं आहे.

ठाणे - दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

sakal_logo
By
सूरज यादव

मुंबईत चेंबुर, विक्रोळी इथं पावसामुळे दुर्घटना घडल्यानंतर आता ठाण्यात एका घरावर दरड कोसळली आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील कळवा, घोलाईनगर भागात ही घटना घडली असून दोघांना वाचवण्यात यश आलं आहे. घटनास्थळी पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी आणि अग्निशमन दल बचावाचे कार्य करत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळव्यातील घोलाईनगर भागात दुर्गा चाळ इथं दुपारी साडेबाराच्या सुमारास दरड कोसळली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जण ढिगाऱ्याखाली अडकले होती. घटनेनंतर स्थानिकांनी दोघांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये प्रभु सुदाम यादव आणि त्यांची पत्नी विद्यादेवी यांच्यासह रविकिशन यादव (वय 12 वर्षे) , सिमरन यादव (वय 10 वर्षे) आणि संध्या यादव (वय 3 वर्षे) यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Mumbai Rain: तुंबलेल्या पाण्यातून रितेश घरातील सामान आणायला गेला अन्...

दरड कोसळल्यानं मोठ्या प्रमाणावर पडलेला मातीचा ढिग काढण्यासाठी चार तासांचा वेळ लागला. त्यानंतर पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातील घरांमधून लोकांना सुरक्षेच्या दृष्टीने इतरत्र हलवण्यात आले आहे. याठिकाणी 150 कुटुंबे वास्तव्यास असल्याची माहिती देण्यात आली.

loading image