'बार, हॉटेलांत संगीतासाठी लॅपटॉपचा वापर नको'

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मुंबई - बार आणि हॉटेलमधील संगीतासाठी लॅपटॉपच्या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी ऑर्केस्ट्रा कलावंतांनी राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबई - बार आणि हॉटेलमधील संगीतासाठी लॅपटॉपच्या वापरावर बंदी आणावी, अशी मागणी ऑर्केस्ट्रा कलावंतांनी राज्य सरकारकडे केली आहे. या मागणीची पूर्तता न झाल्यास मोर्चा काढू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ऑर्केस्ट्रा कलाकार संघटनेची वार्षिक सभा रविवारी (ता. 16) परळ येथे झाली. त्या वेळी ही मागणी करण्यात आली. संघटनेचे कार्य सगळ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आले. बार आणि हॉटेलमधील संगीतासाठी लॅपटॉप अथवा संगणकाच्या वापरामुळे प्रत्यक्ष संगीताचा अनुभव दुर्मीळ झाला आहे. आमच्या कार्यक्रमांचे प्रमाण कमी झाल्याने उपजीविका संकटात आली आहे, असे ऑर्केस्ट्रा कलावंतांचे म्हणणे आहे. संगीतासाठी संगणक व लॅपटॉपचा वापर बंद करण्याची मागणी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केली होती.

Web Title: Laptop Not Use for Bar Hotel Music Orchestra State Government