अंबा नदीतील मासे नकाे रे बाबा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

अज्ञात व्यक्तीने मासेमारी करण्यासाठी नदी पात्रात विष टाकले असावे. या घटनेनंतर पाणी दूषित झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

पाली : अंबा नदी ही सुधागड तालुक्‍याची जीववाहिनी म्हणून ओळखली जाते. याच नदी पात्रात जांभूळपाडा गावाजवळ मंगळवारी (ता. 18) मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. विषामुळे ते मृत झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

धक्कादायक : भक्ष्यांचा पाठलाग करताना तो पडला आणि..

जांभूळपाडा परिसरातील अनेक गावांतील नागरिक अंबा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे मासे मृत झाल्याची माहिती पसरल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सोमावारी (ता. 17) रात्री अज्ञात व्यक्तीने मासेमारी करण्यासाठी नदी पात्रात विष टाकले असावे. या घटनेनंतर पाणी दूषित झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

हे वाचा : विखे पाटील भाजपची साथ सोडणार?

अंबा नदीपात्रात मासे मृत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. ही बाब अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. 
- संदेश लोंढे, ग्रामस्थ 

अंबा नदीतील मृत माशांबाबत माहिती मिळताच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याने तातडीने घटनास्थळी पाहणी केली. त्याला त्या ठिकाणी कोणती संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आली नाही. खबरदारी म्हणून जांभूळपाड्याजवळच्या वऱ्हाड गावालाही खबरदारीचा इशारा दिला आहे. 
- जितेंद्र म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी, जांभूळपाडा 

अंबा नदीच्या जांभूळपाडा येथील पात्रात अनेक वेळा अशा प्रकारे मासे मृत होण्याचे प्रकार घडले आहेत. विषप्रयोगाची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. 
- बरकत पठाण, ज्येष्ठ नागरिक, जांभूळपाडा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A large number of dead fish were found near Jambulpada village on Tuesday