राज ठाकरे यांच्याकडून लता मंगेशकर यांची विचारपूस

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी ब्रीच कॅंडी रुग्णालयात जाऊन गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरेही होत्या. लतादीदींची प्रकृती स्थिर असून त्यांना संसर्ग झाला असल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यांची प्रकृती आधीच्या तुलनेत उत्तम असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली. लतादीदी लवकरात लवकर ठणठणीत होऊन घरी कधी परततील याची आम्ही वाट पाहत आहोत, असेही त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले आहे. गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती सध्‍या खालावली असून, त्‍या ठणठणीत बर्‍या होण्‍यााठी लाखो लोक प्रार्थना करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lata Mangeshkar's inquiry from Raj Thackeray