घणसोलीतील सेंट्रल पार्कचे लोकार्पण रखडले

सेंट्रल पार्क
सेंट्रल पार्क

नवी मुंबई : नवी मुंबई पालिकेच्या वतीने घणसोली सेक्‍टर- ३ मध्ये १० हेक्‍टरवर उभारलेल्या सेंट्रल पार्कचे काम होऊन जवळपास एका वर्षाचा कालावधी पूर्ण झाला. मात्र सावली गावच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे या सेंट्रल पार्कचे लोकार्पण रखडले आहे. त्यातच आता सेंट्रल पार्कच्या देखभाल दुरुस्तीचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेच्या पटलावर येणार आहे. यासाठी ९१ लाख ८५ हजार ६४६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

घणसोली सेक्‍टर- ३ मध्ये १० हेक्‍टर परिसरात १७ कोटी रुपये खर्च करून  पालिकेने भव्यदिव्य असे सेंट्रल पार्क साकारले आहे. २०१५ मध्ये सेंट्रल पार्कच्या कामाला सुरुवात झाली. चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या कामात सुरुवातीच्या दोन वर्षांत अनेक अडचणी आल्या. ज्या ठिकाणी सेंट्रल पार्क उभारण्यात आले, त्या ठिकाणच्या एका भूखंडावर सावली गाव होते. या गावाचे सिडकोकडून पुनर्वसन करण्यात आले नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांकडून सेंट्रल पार्क उभारताना प्रथम पुनर्वसन करा; मग सेंट्रल पार्क उभारा, असा घाट घातला होता. त्यामुळे सेंट्रल पार्कचे काम संथ गतीने सुरू होते. यावरून सर्वसाधरण सभेतदेखील सावली गावातील ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. त्या वेळी पालिकेने सिडकोकडून भूखंड मिळवून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते.

या सेट्रल पार्कमध्ये स्केटिंक रिंक, जलतरण तलाव, मिनी फुटबॉल टर्फ आदी सुविधा निर्माण केल्या असून, या ठिकाणी क्रीडा विभागाकडून प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सेंट्रल पार्कचे काम होऊन बराच काळ झाला; मात्र अद्यापपर्यंत सेंट्रल पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. वापराविना असलेल्या या सेंट्रल पार्कमधील गवत, हिरवळ, झाडेझुडपे यांचे संवर्धन, पार्कमधील राडारोडा, पदपथ, जॉगिंग ट्रॅक, स्वच्छतागृह, तरण तलावाचे व्यवस्थापन, पाणीपुरवठ्यासंबंधीचे कामकाज, पार्कमधील अंतर्भूत विद्युतविषयक काम करण्यात येणार आहे.

राजकीय पक्षांचा इशारा हवेत विरला
सत्ताधाऱ्यांनी उद्‌घाटन केले नाही, तर आम्ही सेंट्रल पार्कचे उद्‌घाटन करू, असा इशारा मनसे, शिवसेना यांनी दिला होता; मात्र या राजकीय पक्षांचा हा इशारा हवेतच विरला असून, अद्यापपर्यत सेंट्रल पार्कचे उद्‌घाटन झालेले नसून, ते धूळ खात पडून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com