esakal | विधान परिषद निवडणूक -  शिवसेनेचा दुसरा उमेदवार ठरला, कोणाला मिळालं तिकीट जाणून घ्या..
sakal

बोलून बातमी शोधा

विधान परिषद निवडणूक -  शिवसेनेचा दुसरा उमेदवार ठरला, कोणाला मिळालं तिकीट जाणून घ्या..

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपल्या उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत.

विधान परिषद निवडणूक -  शिवसेनेचा दुसरा उमेदवार ठरला, कोणाला मिळालं तिकीट जाणून घ्या..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबईः महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेनं आपल्या उमेदवारांची नावं निश्चित केली आहेत. शिवसेनेनं या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना विधान परिषदेचं तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आमदारकीचा पेच सुटला आहे.

21 मे रोजी विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं घोषणा केली. तसंच केंद्रीय निवडणूक आयोगानं तारीख आणि पूर्ण कार्यक्रमही जाहीर केला. मुंबईत ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक सदस्याला जिंकण्यासाठी 29 मतं हवीत. निवडणुकीच्याच दिवशी मतमोजणी पार पडणार आहे. यासाठी 26 मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिलेत.

घृणास्पद ! कामाच्या दुसऱ्याच दिवशी 34 वर्षीय डॉक्टरकडून 45 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णासोबत...

11 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधान परिषद आमदारकीचा अर्ज भरण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांची लगबग सुरु झाली आहे. मुंबईसह ठाणे, रायगड या मतदारसंघातील शिवसेनेच्या आमदारांच्या मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर सह्या झाल्यात.

शिवसेनेनं दोन उमेदवार म्हणजेच, उद्धव ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र अद्याप राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून उमेदवारांची नावं जाहीर केली गेली नाहीत. त्यामुले आता दोन्ही पक्ष कोणाला तिकीट देणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. यापैकी भाजपचे अरुण अडसड, स्मिता वाघ आणि पृथ्वीराज देशमुख यांच्या जागा रिक्त होतील. त्यामुळे विधानसभेला संधी न मिळालेले माजी मंत्री एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे यांची नावं चर्चेत आहेत. तसंच विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या माजी मंत्री पंकडा मुंडे यांनाही संधी मिळू शकते.

'हॅप्पी हायपोक्सिया' ! कोरोना रुग्णांमध्ये आढळून येतायेत 'ही' जीवघेणी लक्षणं, वाढतोय मृत्यूचा धोका

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीसाठीची गणितं बदलली आहेत. यात निवडणुकीत महाविकासआघाडीला पाच आणि भाजपला चार जागा मिळणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 105 जागांवर जिंकणाऱ्या भाजपला आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत तुलनेनं कमी जागांवर संधी मिळेल. तसंच चौथ्या जागेसाठी भाजप मित्रपक्ष आणि अपक्षांची चर्चा करण्याची तयारी करत आहेत.

या जागांसाठी असणार निवडणूक

विधानपरिषदेचे 8 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झालेत. त्यापैकी एक जागा 24 एप्रिलच्या आधीपासून रिक्त आहे. यात राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त झालेत. तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होईल. त्यातच उद्धव ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे 27 मे 2020 पूर्वी विधानपरिषदेची निवडणूक होणं आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना सदस्य होण्याची संधी आहे. 

this leader from shivsena gets ticket to contest MLC election read full story 

loading image