esakal | कोरोनाच्या भितीतही महाराष्ट्रात राजकीय वादंग सुरूच, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला फडणवीसांचं तात्काळ उत्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

fadanvis

राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी ठोस पावलं उचलत नाहीये असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसंच केंद्र सरकारनं राज्याला एकूण किती निधी दिला याबद्दलचे आकडे त्यांनी मांडले होते. 

कोरोनाच्या भितीतही महाराष्ट्रात राजकीय वादंग सुरूच, महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला फडणवीसांचं तात्काळ उत्तर...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कोरोनाचं संकट संपूर्ण देशावर आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीं काही दिवसांपूर्वी तब्बल २० लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. या योजनेला 'आत्मनिर्भर योजना' असं नावंही देण्यात आलं होतं. मात्र तेव्हापासूनच यावरून केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु आहे. 

हे पॅकेज जाहीर केल्यांनतर मुंबईसाठी केंद्र सरकारनं वेगळं पॅकेज जाहीर करावं अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर राज्यातल्या इतर नेत्यांनीही त्यांना दुजोरा दिला होता. यावरून काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलं होतं. विरोधी पक्ष भाजपनं महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. केंद्र सरकारकडून मदत मिळूनही राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी ठोस पावलं उचलत नाहीये असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. तसंच केंद्र सरकारनं राज्याला एकूण किती निधी दिला याबद्दलचे आकडे त्यांनी मांडले होते. 

हेही वाचा: अनिल परब यांनी केली फडणवीसांच्या आकडेवारीची पोलखोल

त्यावर आज परिवहन मंत्री अनिल परब, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनीं दिलेल्या आकड्यांची पोलखोल केली. तसंच महाराष्ट्राच्या हक्काची आर्थिक मदतही केंद्रानं केली नाही असा आरोप अनिल परब यांनी केला. मात्र यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.  

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस: 

  • केंद्र सरकारनं दिलेले पैसे राज्य सरकारच्या त्या त्या खात्यात जमा झाले आहेत. तसंच केंद्र सरकारनं टॅक्सचे पैसे आणि जिएसटीचे पैसे राज्य सरकारला दिले आहेत. 
  • कुठल्या राज्याला किती पीपीई किट देण्यात येतात याची नोंद ठेवली जाते. २६ मेपर्यंत राज्याला १० लाख पीपीई किट देण्यात आल्या आहेत. तसंच १६ लाख मास्क देण्यात आले आहेत.
  • मुंबईत टेस्टची संख्या कमी करण्यात आली आहे. मे महिन्यात मुंबईत तब्बल ३२ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. 
  • स्थलांतरितांच्या जाण्यामुळे भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मात्र भूमिपुत्रांना तसे स्किल्स देणं महत्वाचं आहे.  

हेही वाचा: केंद्राकडून कोणताही निधी आला नाही, महाविकास आघाडीकडून फडणवीस यांचा भांडाफोड

राज्यात कोरोनाग्रस्तांचं प्रमाण वाढत आहे. ४० टक्के मृत्यू हे महाराष्ट्रात होत आहेत आणि तरीही नेते स्वतःचीच पाठ थोपटत आहेत. कृपया खोटी आकडेवारी देऊ नका. केंद्र सरकारकडून काही येत नाही हे सांगू नका. मित्र कोण आणि शत्रू कोण हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलंय. 

त्यामुळे महाविकास आघाडीत आणि भाजपमध्ये हे आरोप- प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे.  

leaders of MVA are busy in praising them said fadanvis read full story