
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा समाजमाध्यमात सुरू असून या पदावर आमदार शशिकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जयंत पाटील यांच्या राजीनाम्याचे वृत्त हा खोडसाळपणा असल्याची टीका पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यामुळे १५ जुलैला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीतच प्रदेशाध्यक्षपदाचा फैसला होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने पक्षातील मतभेद मात्र चव्हाट्यावर आले आहेत.