पैशाअभावी घ्यावी लागली रजा 

पैशाअभावी घ्यावी लागली रजा 

मुंबई -  वेतन न झाल्यामुळे कामावर जाण्यापुरतेही पैसे नाहीत, म्हणून बेस्ट उपक्रमाच्या बॅकबे आगारातील एका कर्मचाऱ्याला एक दिवसाची रजा घ्यावी लागली. त्याने रजेच्या अर्जातच ही व्यथा व्यक्त केली आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचे हाल सुरू असल्याचे समोर आले आहे. 

बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात आहे. कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेत मिळत नाहीत. आतापर्यंत महिन्याच्या 15 तारखेला होणाऱ्या पगाराचा दिवस आणखी पुढे गेला आहे. परिणामी, कर्मचाऱ्यांना घरखर्च चालवणेही कठीण झाले आहे. घरासाठी घेतलेल्या कर्जाचा हप्ता, मुलांचे शाळा-महाविद्यालये-खासगी क्‍लासचे शुल्क, वैद्यकीय उपचाराचा खर्च भागवणे कठीण झाले आहे. बेस्ट प्रशासनाने फेब्रुवारीचे वेतन 30 मार्चला आणि त्यापुढील तीन महिन्यांचे वेतन महिन्यातील 20 तारखेला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. 

प्रतिक्रिया 
पैशाअभावी बेस्ट उपक्रमातील एक कर्मचारी कामावर हजर राहू शकला नाही. रजेच्या अर्जातच त्याने ही व्यथा मांडली आहे. ही परिस्थिती भीषण असून, बेस्ट प्रशासनाने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत द्यावे. पगाराअभावी घर चालवण्यात अडचणी येत असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचण्याची भीती आहे. 
- सुनील गणाचार्य, सदस्य, बेस्ट समिती 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com