डाव्यांची शिवसेना भाजपाशी कडवी झुंज 

संजय शिंदे
रविवार, 24 जून 2018

मुंबई : मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत पुरोगामी आणि डाव्या पक्षांचे प्रतिनिधीत्व करीत असलेले पुरोगामी पदवीधर आघाडीचे उमेदवार अॅड. राजेंद्र कोरडे यांनी शिवसेना भाजपाला कडवे आवाहन उभे केले असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक वर्षानंतर डाव्या पक्षासह कॉंग्रेस, आंबेडकरी, पुरोगाम्याने पहिल्यांदाच शिवसेना तगडे आवाहन उभे केले असल्याने आता शिवसेना आणि भाजपाला डाव्यांच्या या उमेदवाराला कडवी झुंज द्यवी लागणार असल्याची चर्चा मुंबईत आहे. 

गेली अनेक वर्षे मुंबई पदवीधर मतदारसंघाची जागा शिवसेनेच्या ताब्यात आहे. गेली 12 वर्षे डॉ. दीपक सावंत आणि त्यापूर्वी प्रमोद नवलकर हे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत होते. मात्र यावेळी शिवसेनेने डॉ. सावंत यांना डावलून विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनेही शिवसेनेला धक्का देण्याच्या उद्देशाने अॅड. अमीत मेहता यांच्या रुपाने स्वतंत्र उमेदवार दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला स्वाभिमानी पक्षाने आणि मनसेने संयुक्तरित्या उमेदवार दिला आहे. शेकापने अॅड. राजेंद्र कोरडे यांना प्रथमच उमेदवार दिली असून कॉंग्रेससह सर्वच पुरोगामी पक्षाने त्यांना पाठींबा दिला असल्याने कोरडे यांनी आवाहन उभे केले आहे.

गेल्या दोन वर्षापासून ते या निवडणुकीची तयारी करीत असून त्यांच्या उमेदवारीला कोरडे यांना शेकाप बरोबरच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, जनता दल सेक्युलर, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्याबरोबरच आनंदराज आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना, डॉ. सुरेश माने यांचा बीआरएसपी, कामगार संघटना संयुक्त कृती समिती, बॉम्बे युनिव्हर्सिटी ऍण्ड कॉलेज टिचर्स युनियन (बुक्टू, टीडीएफ, तसेच डाव्या चळवळीतील विविध शिक्षक, कामगार आणि सामाजिक संस्था संघटनांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे.

गेल्या 15 वर्षात मुंबईत मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढले असून सर्व मुस्ल्मि मतदारही कोरडे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. मराठी मतदारांसह उत्तरभारतीय आणि मुस्ल्मि मतदारही कोरडे यांच्या पाठीशी आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेक  पक्ष-संघटनांच्या पाठिंब्यामुळे अॅड. राजेंद्र कोरडे यांचे पारडे जड झाले असून त्यांनी सेना-भाजपच्या उमेदवारांसमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. किंबहुना यावेळी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चमत्कार घडवून मूळची समाजवाद्यांचीच असलेली ही जागा पुन्हा खेचून आणण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पक्षासह सर्वांनी ताकत लावली असल्याची चर्चा आहे.

Web Title: Left to fight against Shiv Sena and BJP