esakal | बिबट्याचा महिलेवर हल्ला, आरे कॉलनीतील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

बिबट्याचा महिलेवर हल्ला, आरे कॉलनीतील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आरे कॉलनी (Aarey Colony) मधील एका महिलेवर बिबट्याने (Leopard) हल्ला केला. या हल्ल्यात ती महिला (women) जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. बिबट्याचा (Leopard) हा जीवघेणा हल्ला नसून स्वतःच्या बचावासाठी त्याने महिलेला जखमी केले असावे असा अंदाज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (Sanjay Gandhi National Park) अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी रात्री आरे कॉलनी युनिट 31 मधील रहिवासी लक्ष्मी उंबरसाडे या रात्री 9.30-10 च्या सुमारास घरी परतत असताना अचानक बिबट्या त्यांच्या समोर आल्या.यामुळे भांबावलेल्या लक्ष्मी यांच्यावर बिबट्याने स्वसंरक्षणार्थ हल्ला करून पळ काढला. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या लक्ष्मी उंबरसाडे खाली पडल्याने त्यांच्या पायाला आणि डोक्याला ही किरकोळ जखमा झाल्या आहेत.

ठाणे वनविभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पथकाला तात्काळ याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी आरेमध्ये कॅमेरा ट्रॅकिंग करणाऱ्या स्वयंसेवकांच्या टीमसह घटनास्थळी भेट दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आर्यन लँडस्केपमध्ये कॅमेरा ट्रॅकिंगचे काम करत असलेले जीवशास्त्र निकित सुर्वे यांनीही रात्री घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंगळवारी सकाळी त्यांनी परिसरात कॅमेरा ट्रॅप बसवले.दोन दिवसांपूर्वी हा प्रकार घडल्याचे सांगत दुजोरा दिला.

हेही वाचा: धक्‍कादायक...‘निगेटिव्ह’ सांगत दिला डिस्चार्ज; महिला घरी पोहचली आणि 

प्रथमदर्शनी असे दिसते की बिबट्याने हा मुद्दामहून केलेला हल्ला नव्हता, तर कदाचित महिला आणि बिबट्या अचानक समोरासमोर आल्याने बिबट्याने स्वसंरक्षणासाठी हल्ला केला असावा असे दिसते असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

या परिसरात आधीच कॅमेरा ट्रक केले आहेत. शिवाय स्थानिक रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन ही केले आहे. अचानक बिबट्या दिसल्यावर त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दलही त्यांना समजावून सांगितले आहे असे ही या अधिकाऱ्याने सांगितले.

loading image
go to top