esakal | पडक्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

पडक्या विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वासिंद : वासिंदपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या वांद्रे (Vandre) गावाजवळील घाटाळ पाडा येथील एका पडक्या विहिरीत पडून बिबट्याचा (Leopard) मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना (Forest Department officials) घटनास्थळी दाखल होऊन मृत बिबट्याला (Leopard) बाहेर काढले.

पिवळी जवळील वांद्रे येथील घाटाळ पाडा या आदिवासी पाड्यावर असलेल्या एका जुन्या पडक्या विहिरीत बिबट्या पडला असून त्या ठिकाणी दुर्गंधी येत असल्याची माहिती येथील शिवसेना शाखाप्रमुख विजय रेरा यांनी दिली. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने व कठडा तुटलेल्या अवस्थेतील या पडीक विहिरीवर स्थानिक रहिवाशांची वर्दळ नसल्याने बिबट्या विहिरीत पडल्याचे उशिरा लक्षात आले, असे पर्यावरणवादी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गोतारणे यांनी सांगितले. बिबट्याला रात्री शासकीय जागेत ठेवून त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

हेही वाचा: मुंबई पोलिसांनी सिद्धार्थची कार केली जप्त; काल रात्री काय घडलं?

बिबट्या पाण्यात बुडून मरण पावल्याचे प्राथमिक अहवालात नमूद झाले असल्याचे शहापूर वनक्षेत्रपाल प्रकाश चौधरी यांनी म्हटले आहे. हा बिबट्या अंदाजे साडेतीन वर्षांहून अधिक वयाचा असून याबाबत पुढील आवश्यक तपासणी केली जाणार असल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top