राष्ट्रीय उद्यानातील बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कृष्णा या 18 वर्षीय मादी बिबट्याचा न्यूमोनियाने रविवारी (ता. 29) पहाटे दोन वाजता मृत्यू झाला.
कृष्णाने शुक्रवारपासून अन्न-पाणी बंद केल्याने तिची प्रकृती चिंताजनक होती, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली. तिला उद्यानातील लेपर्ड रेस्क्‍यू सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. या केंद्रात आता 14 बिबटे आहेत.

कृष्णा गेल्या वर्षापासून वारंवार आजारी पडत होती. दोन दिवसांपासून तिची प्रकृती आणखी खालावली होती. तिने अन्न-पाणीही सोडले होते. तिच्या छातीत वेदना होत असल्याचे निदर्शनास आल्यावर तिची चाचणी करण्यात आली. त्यातून तिला न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले होते, असे डॉ. पेठे यांनी सांगितले.

बिबट्याचे वयोमान साधारणपणे 12 ते 14 वर्षे असते. कृष्णा 18 वर्षांची होती. वृद्धापकाळामुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्‍यता कमी होती, असे डॉ. पेठे म्हणाले. तिला 1999मध्ये रायगड जिल्ह्यातून उद्यानात आणले होते, ती लहानाची मोठी याच उद्यानात झाली.

Web Title: leopard in sanjay gandhi zoo dies