

Malad Leopard Video Viral
ESakal
मुंबई : मुंबईतील उपनगरांमध्ये बिबट्याचा वावर वाढल्याच्या घटना ताज्या असतानाच, आता मालाड (पूर्व) परिसरातील रहेजा हाइट्स सोसायटीनजीक बिबट्या दिसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास सोसायटीच्या ‘डी’ विंग परिसरातील पार्किंगमध्ये बिबट्या वावरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.