शहापुरात आढळल्या बिबट्याच्या पाऊलखुणा! 

बिबट्याच्या पावलाचे ठसे
बिबट्याच्या पावलाचे ठसे

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या किन्हवली परिसरात सातत्याने बिबट्याच्या संचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र सोमवारी चक्क किन्हवली शहरातच बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

किन्हवली-नायक्‍याचा पाडा रस्त्यावर राहुल धाब्याशेजारी वेल्डिंग वर्कशॉप असलेल्या नितीन दिनकर यांना सकाळी 9 वाजता दुकान उघडत असता बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसले. किन्हवली येथील वनपाल विकास लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी त्या पावलांच्या ठशांचे चित्रीकरण केले असून त्यांनी बिबट्या असल्याची शक्‍यता नाकारली नाही. 

धसई वनपरिक्षेत्रातील किन्हवली परिसरात "कुऱ्हाड बंद' मोहिमेमुळे जंगल वाढले आहे. यामुळे बिबट्या, कोल्हे, तरस अशा श्वापदांच्या संख्येत वाढ झाली. परंतु जंगलात भक्ष्य मिळत नसल्याने हे प्राणी कुत्रे, कोंबड्या यांची शिकार करण्यासाठी मानवी वस्तीकडे वळत आहेत.

सुमारे दोन वर्षांपूर्वी किन्हवली शेजारच्या गावातील अनेक शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले होके. यात काहींच्या बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. काही ठिकाणी बिबट्या असल्याच्या वृत्ताला वनाधिकाऱ्यांनीसुद्धा दुजोरा दिला आहे. सध्या भातलावणीचा हंगाम असल्याने बिबट्याच्या पाऊलखुणा आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com