विद्यार्थ्यांनी गिरवले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

मुरलीधर दळवी
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

मुरबाड (ठाणे) : शिवळे महाविद्यालयात शनिवारी (ता 22) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सोनुभाऊ बसवंत कॉलेज शहापूर, अगरवाल कॉलेज कल्याण, शिवळे महाविद्यालय, कला व वाणिज्य महाविद्यालय किन्हवली, पी डी कारखानीस कॉलेज अंबरनाथ या पाच महाविद्यालयातील 100 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला
.     

कार्यशाळेचे उदघाटन माजी आमदार गोटीराम पवार यांनी तर समारोप जनसेवा शिक्षण मंडळाचे सहसचिव भास्कर हरड यांचे हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. उल्हासनगर महापालिकेचे उपप्रमुख अग्निशामक अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन डॉ एस एस बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन प्रिया भगत यांनी केले शिवळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम पाटील, उपप्राचार्य गीता विशे, जनसेवा शिक्षण मंडळाचे संचालक मुरलीधर दळवी कार्यक्रमास उपस्थित होते
 
Web Title: Lessons of disaster management