ग्रामीण भागातील महिलांनी गिरवले रोजगाराचे धडे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहराला लागून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भाग आहे. येथील बहुसंख्य महिला शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत आहे. या अशा महिलांना महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योजगतेचे धडे मिळावे व त्यांना रोजगार प्राप्त व्हावा यासाठी डोंबिवली पूर्वेकडील पिंपळेश्वर मंदिर परिसरात बी. के. फाऊंडेशनच्या वतीने रोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. सुमारे तीन हजार महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला.

उद्योग मार्गदर्शक इरफान कौशाली यांनी यावेळी महिलांना विविध उद्योगांच्या  संकल्पना सांगत महिलांना प्रोत्साहन दिले. तसेच दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, हस्तकला, शेळी-मेंढीपालन याबाबतही विस्तृत माहिती देण्यात आली. अनेक महिलांनी यावेळी आपल्या समस्याही विचारल्या. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी स्त्रीशक्तीचा नारा देत महिला या पुरुषांपेक्षा अधिक मेहनती आणि कष्टाळू असून त्यांचे नियोजन परिपूर्ण असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलाही उपस्थित असल्याने इतर महिलांना त्यांच्याकडून सकारात्मक ऊर्जा मिळाली. 

यावेळी बीके फाऊंडेशनचे अध्यक्ष धनाजी पाटील, ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर, अॅडव्होकेट सुवर्णा पावशे, बालाजी पाटील, आकाश  पाटील, शुभम पाटील आदी  उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lessons of Employment by Women in Rural Areas