esakal | दोन तास तरी ढोल ताशे वाजवू द्या !
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

दोन तास तरी ढोल ताशे वाजवू द्या !

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ढोल ताशांचा (Dhol- Tasha) गजर, गुलालाची उधळण करीत गणेशाचे आगमन झाले की भक्तांसोबत मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्येही जोश संचारतो. मात्र कोरोना (Corona) संक्रमनामुळे गेल्यावर्षी गणेशोत्सव (Ganesh Festival) साजरा करता आला नाही. यंदा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे किमान 2 तास तरी मंडळाच्या आवारात एकाच जागी वादन करण्यास मंडळांना परवानगी द्यावी अशी मागणी मंडळांनी केली आहे.

गणेशोत्सवात गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत ढोल - ताशा पथकांना मागणी असते. मंडळाच्या गणपतीची मिरवणूक वाजत गाजत काढावी अशी मंडळातील कार्यकर्त्यांची देखील अपेक्षा असते. मात्र गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गणेशोत्सवावरच अनेक निर्बंध घातले गेल्याने मंडळांनीही सर्व नियमांचे पालन करीत दिड दिवसांचा उत्सव साधेपणाने साजरा केला. मात्र यंदा 2021 ला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून निर्बंधही कमी झाले आहेत. यामुळे किमान 2 तास मंडळांना आवारात एका जागी वादन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय संस्थेच्या वतीने पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली आहे.

हेही वाचा: शहरातील गुन्हेगारी ! कोणत्या भागात काय घडले... वाचा सविस्तर

कल्याण शहरातील काही नामांकित मंडळे 125 वर्षा पेक्षा अधिककाळ आपला उत्सव साजरा करत आहे. हा उत्सव करतेवेळी कोणत्याही नियमांचे उल्लंघन मंडळांनी कधी केले नाही. कोरोना काळातही पालिकेला मंडळांनी सहकार्य केले आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे. हॉटेल्स, दुकाने सुरू झाली आहेत.

लग्न सोहळ्यातही 100 जणांना परवानगी दिली जाते. मग गणपती उत्सवात अटी शर्तींवर परवानगी द्यावी. ढोल ताशा वादनास किमान दोन तास वादनाची परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांनाही रोजगार मिळेल व उत्सवात गणपती उत्सव साजरा होईल.

संतोष पष्ठे, संस्थापक, कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय संस्था

loading image
go to top