शहरातील गुन्हेगारी ! कोणत्या भागात काय घडले... वाचा सविस्तर

शहरातील गुन्हेगारी ! कोणत्या भागात काय घडले... वाचा सविस्तर
शहरातील गुन्हेगारी !
शहरातील गुन्हेगारी !Canva
Summary

दुकानासाठी भांडवल म्हणून माहेरून दहा लाख रुपये आण म्हणून शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केली, अशी फिर्याद लावण्या गणेश तुम्मा यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली.

तीन माजी महापौरांसह कॉंग्रेस शहराध्यक्षांविरूध्द गुन्हा

सोलापूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) शहर कॉंग्रेसतर्फे (Congress) तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. मात्र, ही पदयात्रा विनापरवाना व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता काढली. कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव होण्यास ते कारणीभूत ठरले. त्यांनी जाणीवपूर्वक रेल्वे स्थानक परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुतळ्यापासून महापौर बंगला, डफरीन चौक, हरिभाई देवकरण प्रशाला ते कॉंग्रेस भवन (Congress Bhavan) अशी पदयात्रा काढली, असे पोलिस फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी माजी महापौर रफिक शेख, अलका राठोड, नलिनी चंदेले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, बाबा मिस्त्री, वैष्णवी करगुळे, हेमा चिंचोळकर यांच्याविरूध्द सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पायी चालत जाताना मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात हंसराज किसनराव चिलवेरी यांचा मृत्यू झाला. हयगयीने व अतिवेगाने दुचाकीस्वार (एचएच 13, सीई 6830) विनायक सदानंद कौकुंटला (रा. जुना विडी घरकुल) यांनी चिलवेरी यांना धडक दिली. हा अपघात 31 जुलैला रात्री साडेसातच्या सुमारास सोना-चांदी अपार्टमेंट ते हिरामोती टॉवररोडलगत घडला. या अपघातात चिलवेरी यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संदीप भोसले यांनी दुचाकीस्वार कौकुंटलाविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मुरकुटे हे करीत आहेत.

शहरातील गुन्हेगारी !
श्रद्धेचे प्रतीक जेऊर येथील स्वयंभू श्री काशीविश्‍वेश्‍वर मंदिर

कॅनॉलच्या कामावरील सळई चोरी

बाळे परिसरातील देशमुख वस्तीजवळ कॅनॉलचे बांधकाम सुरू आहे. त्या कामासाठी आणलेल्या चार हजार दोनशे रुपयांच्या सळई चोरी झाली आहे. या प्रकरणी अजय, लक्ष्मण महाळू माने आणि सुनीता श्‍याम कांबळे (रा. क्रांती नगर झोपडपट्टी, गडदर्शनजवळ) या तिघांविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विजयसिंग पाटील यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस हवालदार गवळी हे करीत आहेत.

विनापरवाना मोहरम पंजाचा कार्यक्रम; संयोजक सय्यद काझींविरुद्ध गुन्हा

विनापरवाना, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करून मोहरम पंजाचा कार्यक्रम घेतला. त्यावेळी 80 ते 100 लोकांना एकत्रित जमवून कोरोनासंबंधीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सय्यद अहेमद अब्दुल रहेमान काझी (रा. बेगम पेठ) यांच्याविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दोन व्यक्‍तींमध्ये सामाजिक अंतर न ठेवता लोकांना एकत्रित जमवले. कोरोना या धोकादायक विषाणूचा संसर्ग होऊन जनहितास धोका निर्माण करून कोरोनाचा प्रादुर्भाव होईल असे जाणीवपूर्वक कृत्य केले, अशी फिर्याद पोलिस नाईक विठ्ठल धादवड यांनी पोलिसांत दिली. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला असून पोलिस नाईक पठाण हे पुढील तपास करीत आहेत.

घराचा दरवाजा तोडून चोरी

घराचा दरवाजा तोडून चोरट्याने घरातून 28 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सोमवार पेठेतील दीपक नवनाथ सुरवसे यांनी याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान, सुरवसे हे घरात आराम करत होते. त्यावेळी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजा तोडून चोरट्याने घरात प्रवेश केला. हॉलमधील तीन मोबाईल चोरट्याने चोरून नेले, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस नाईक पठाण हे तपास करीत आहेत.

शहरातील गुन्हेगारी !
पालकमंत्री भरणेंना मंत्रिमंडळातून काढून टाका : आमदार शहाजी पाटील

खरेदी करताना मोबाईलची चोरी

केळीच्या खुंटांची खरेदी करताना चोरट्याने मोबाईल चोरून नेल्याची घटना मधला मारुती परिसरात घडली. याप्रकरणी नामदेव नारायण भडंगे (रा. आदर्श नगर, कुमठा नाका) यांनी जेलरोड पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादी नामदेव भडंगे हे मधला मारुती चौकात केळीचे खुंटे खरेदी करीत होते. त्यावेळी त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्याने त्यांच्या शर्टाच्या खिशातून मोबाईल पळविला. सहाय्यक फौजदार सातपुते हे पुढील तपास करीत आहेत.

घरातून चार्जरसह लॅपटॉप लंपास

अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेल्यावर चोरट्याने घरात प्रवेश करून साडेदहा हजारांचा लॅपटॉप व चार्जर चोरून नेल्याची घटना होटगी रोडवरील रामलाल नगरात घडली. पिनाक दादाराव डांगे यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. पिनाक हे दुसऱ्या मजल्यावरील खोलीतून अंघोळीसाठी खाली बाथरूममध्ये आले होते. त्यावेळी चोरट्याने घरात प्रवेश करून चोरी केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस नाईक गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

पूर्ववैमनस्यातून हाणामारी; 23 जणांविरुद्ध गुन्हा

मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना अक्‍कलकोट रोड परिसरात घडली. लजा राजू बंडा (रा. समाधान नगर, अक्कलकोट रोड) यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून महादेव बिराजदार, सुरेखा पाटील, मेहबूब बागवान, संजू पाटील, के. के. खालिद, चॉंद बाबूलाल शेख, अजिजबी बाबूलाल शेख, सकिना, मुन्ना, सुलेमान, इनायत मोहोळकर यांच्यासह एकूण 23 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपींनी मागील भांडणातून फिर्यादी बंडा यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून दमदाटी करीत मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक माळी हे तपास करीत आहेत.

शहरातील गुन्हेगारी !
कॉंग्रेसचे वड्डेटीवार 'या' मागणीसाठी सोडणार मंत्रिपद !

कोरोनाचे निर्बंध मोडले; 11 जणांविरुद्ध गुन्हा

कोरोनाचे नियम मोडून विनापरवाना जमाव जमवून विषाणूच्या वाढीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जिल्हा परिषदेसमोरील पूनम गेट या मार्गावर त्यांनी महागाईविरोधात मोर्चा काढला. या प्रकरणी अजय मैंदर्गीकर, श्रीकांत चलवादी, मनोज गोडसे, नितीन गायकवाड, सूरज गायकवाड, राहुल गायकवाड, विशाखा उबाळे, कृष्णबाई माने, कौशल्या वाघमारे, नजमा शेख, ताहेरा शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक आरशेवार हे पुढील तपास करीत आहेत.

साडेपाच लाखांचा गुटखा जप्त

येथील कुमठा नाका परिसरातून सदर बझार पोलिसांनी वाहनासह साडेपाच लाखांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी जुनेद जावेद बागवान (रा. विडी घरकुल रिक्षा थांब्याजवळ) आणि गौस अलिम शेख (रा. एजाज सायकल दुकानासमोर, पेंटर चौक) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी गुटखा, पानमसाला, मावा, सुंगधित तंबाखूचा साठा विक्रीच्या उद्देशाने करून ठेवला होता. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रज्ञा सुरसे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळुंखे करीत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलाकर ताकवले, पोलिस निरीक्षक चंद्रकांत वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोळुंखे, पोलिस हवालदार कृष्णा बडूरे, नितीन गायकवाड, राहुल आवारे, सागर सरतापे यांच्या पथकाने केली.

माहेरून पैसे आण म्हणून सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

मोबाईल विक्रीच्या दुकानासाठी भांडवल म्हणून माहेरून दहा लाख रुपये आण म्हणून शिवीगाळ, मारहाण व दमदाटी केली, अशी फिर्याद लावण्या गणेश तुम्मा यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. त्यावरून पती गणेश जनार्दन तुम्मा, सासू ललिता तुम्मा (रा. न्यू रंगराज नगर, जुना विडी घरकुल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. माहेरून पैसे आण, मग तुझा नवरा तुला चांगला नांदवेल, असे सासू म्हणाली. तरीही, पैसे आणले नाहीत म्हणून तिने नांदवण्यास नकार दिला. तसेच तू फोन करू नकोस, नाहीतर तुला रस्त्यात मारून टाकेन, अशी धमकी पतीने दिली, असेही फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस नाईक चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com