...तर प्राण्याच्या पिल्लांना 'चंपा' आणि 'चिवा' अशी नाव ठेऊ - महापौर पेडणेकर

चित्रा वाघ यांच्या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलक्या शब्दांत उत्तर दिलं आहे.
Chitra Wagh_Kishori Pednekar
Chitra Wagh_Kishori Pednekar

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मराठी पाट्यांच्या निर्णयावर टीका करताना भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन टीका केली होती. याला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबई महापालिकेच्या प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या पिलांची नाव आता चंपा आणि चिवा ठेऊ, असं त्यांनी म्हटलं आहे. महापौरांच्या या विधानामुळं वाद होण्याची चिन्हे आहेत. (lets name animal cubs Champa Chiva Mayor Kishori Pednekar attack on Chitra Wagh)

Chitra Wagh_Kishori Pednekar
UP Election : भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद CM योगींविरोधात लढणार

पत्रकार परिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर टीका करताना महापौर किशोरी पेडणेकर या काहीशा संतापल्या आणि त्यांनी ते विधान केलं. त्या म्हणाल्या, "आम्ही वाघिणीच्या बछड्याचं नाव वीरा ठेवलंय. तसंच पेंग्विन हे मुलांसाठी वेगळं आकर्षण आहे. पण इतक्या खालच्या स्तरावर येऊन तुम्ही टीका करणार असाल तर पुढच्या वेळी आपण चिवा आणि चंपा अशी नावं ठेऊ. तुम्हीच म्हटला आहात ना मराठी नावं ठेवा मग आता येणाऱ्या हत्तीच्या बाळाचं नाव आम्ही चंपा ठेऊ आणि माकडाचं बाळ आहे त्याचं नाव चिवा ठेऊ"

Chitra Wagh_Kishori Pednekar
सोमवारपासून राज्यातील शाळा सुरू, मंत्रीमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

तसंच त्यांनी विचारलंय की, मराठी नाव करताना ते लंडन, अमेरिका असं केलंय का? पण असं विचारण्यापेक्षा ते करायला हवंय. भाजपचे सामान्य नगरसेवकही लंडन-अमेरिकेत फिरुन येत आहेत. पण आमच्या मुंबईतील सर्वसामान्य लोकांना तिकडे जाता येत नाही, तिथला आनंद जर आम्ही इथल्या लोकांना देतअसू तर यांची पोटदुखी काय आहे? चांगलं काम करतोय हे त्यांना दुखतंय की सामान्य माणसाची गरज ओळखून आम्ही त्यांना ते देतोय हे दुखतंय. की फक्त मला चमकायचंय आणि विरोध करायचा बस्स असं सुरु आहे, अशा शब्दांत पेडणेकर यांनी वाघ यांच्यावर टीका केली.

चित्रा वाघ यांनी काय केली होती टीका?

चित्रा वाघ यांनी काही वेळापूर्वी आपल्या ट्विटर हँडलवरुन फोटो पोस्ट करत मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार निशाणा साधला होता. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, "मराठीला फक्त पाट्यांपुरताच भाव, युवराजच्या पेंग्विनचं इंग्रजीत नाव?" पुढे एका चित्रात महापौर पेडणेकर पत्रकारांशी बोलताना म्हणताहेत की, "साहेबांनी मराठी पाट्या लावायला सांगितल्या आहेत. मराठी नामकरण करण्यास नाही" तर दुसऱ्या एका चित्रात एक पेंग्निन आई आपल्या नुकत्या जन्मलेल्या बाळाला म्हणतेय की, "ताईंनी किती छान नाव दिलं आहे तुला Oscar बाळ"

वाघ यांच्या या पोस्टमधून थेट महापौर पेडणेकर यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. त्यामुळं पेडणेकर यांनी त्यांच्यावर पलटवार करताना आता आम्ही चंपा आणि चिवा अशी मराठीतील नावं ठेऊ अशा शब्दांत टोला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com