esakal | विद्यापीठाच्या भविष्यावर चर्चा करण्याचा नवा पायंडा पाडू या; प्रा. सुहास पेडणेकर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-University

विद्यापीठाच्या भविष्यावर चर्चा करण्याचा नवा पायंडा पाडू या; प्रा. सुहास पेडणेकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये अनेक सदस्य तेच तेच विषय मांडत असतात, त्यातून विद्यापीठाच्या भविष्यावर अथवा विकासावर चर्चा होत नाहीत, यामुळे केवळ विद्यापीठाच्या भविष्यावर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हातावर खास तासभर तरी चर्चा व्हावी, असा एक पायंडा आपण निर्माण करू या असे आवाहन कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी आज सिनेट च्या आज सुरू झालेल्या सर्वसाधारण सभेत केले.

तब्बल दोन वर्षानंतर विद्यापीठाची सिनेट ही ऑफलाईन पद्धतीने फोर्ट संकुलातील दीक्षांत सभागृहात आज सकाळी 11 वाजता सुरू झाली.सकाळी 12 व,13 मार्च 2021 रोजी झालेल्या इतिवूत्तावर चर्चा होऊन ते संमत करण्यात आले, त्यानंतर याच दिवसाच्या अधीसभेच्या कार्यवाहीचा अहवाल सादर करत असताना यावेळी युवा सेनेचे सदस्य प्रदीप सावंत, महादेव जगताप, डॉ. धनराज कोहचाडे आदींनी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या विरोधात आदिवासी विभागाने केलेल्या तक्रारीनंतर सबांधितांवर विद्यापीठ कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण करते काय असा सवाल करत कुलगुरूंना यासाठी जाब विचारला.

हेही वाचा: Drugs Case: आर्यन खानसह ८ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

त्यातच मध्ये प्राचार्यांचे सदस्य डॉ. अजय भामरे यांनी प्र कुलगुरू रवींद्र कुलकर्णी बोलत असताना त्यांचा माईक ओढून खाली केला, सिनेट सदस्य डॉ. वैभव नरवडे यांनी जोरदार आक्षेप घेत हे योग्य नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सभागृहात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाल्याने यावर कुलगुरूंनी दखल घेत ज्या चुका पुन्हा पुन्हा होतात, त्या पुढे टाकून येत्या काळात केवळ मुंबई विद्यापीठाच्या भविष्यावर, त्याच्या शैक्षणिक विकासावर आणि विद्यार्थी, शैक्षणिक गुणवत्ता यावर सिनेटमध्ये चर्चा करण्याचा नवा पायंडा पाडू. पुढील काही वर्षात अभ्यासक्रम, शिक्षण विकासावर इतर ठिकाणी आणि आपल्याकडे आणखी काय चांगले करता येईल यावरच चर्चा करू या असेही कुलगुरूंनी आवाहन केले.

दरम्यान, महाद प्पा गोंडा. यांनीही सिनेटमध्ये गुणवत्तेवर चर्चा व्हावी, एकमेकांवर आरोप न करता, चांगल्या चर्चा व्हाव्यात अशी सूचना केली होती. तर सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे यांनी विद्यापीठ कायदा, यूजीसी आदींनी अनेक अधिकार आपल्याला देण्यात आले असून या अधिकाराचा वापर करावा. आमच्या कोणत्याही मागण्या या खाजगी नसतात, त्यामुळे आम्ही ज्या अनागोंदी कारभारावर बोलतो, त्यावर कारवाई करून न्याय द्यावा अशी मागणी केली तर महादेव जगताप यांनी आम्हाला उत्तरे का मिळत नाहीत, असा आक्षेप घेतला. तुमच्याकडून उत्तरे आली तर आम्हाला प्रश्न विचारण्याची गरजच पडणार नाही असे सांगत कुलगुरूंनी विद्यापीठाच्या भविष्यावर चर्चा करण्यापूर्वी सध्याचा असलेला कारभार सुधारावा अशी मागणी त्यांनी केली.

loading image
go to top