मुंबईच्या विकासाची लढाईही जिंकू; उद्धव ठाकरे यांना विश्‍वास 

मुंबईच्या विकासाची लढाईही जिंकू; उद्धव ठाकरे यांना विश्‍वास 

मुंबई  : राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने अहोरात्र प्रयत्न करून कोव्हिड नियंत्रणात आणला. आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरू झाली असून ही लढाईही आपण जिंकूच, असा विश्‍वास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. 

नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतच्या भुयारी मार्गाच्या टप्प्यासाठीचे खोदकाम आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरू झाले. भारतीतील सर्वांत मोठ्या टनेल बोअरिंग मशीनने हे खोदकाम सुरू झाले आहे. या मशीनचे नामकरण "मावळा' असे करण्यात आले आहे. हा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले, की "कसोटीच्या काळात राज्याचे नेतृत्व करताना "मावळ्यां'नी दिलेल्या योगदानामुळे क'ोरोनाविरोधातील लढाई जिंकत आलो आहोत. आता मुंबईच्या विकासात "मावळ्या'ची भूमिका महत्त्वाची ठरेल, असेही त्यांनी नमुद केले. कोणतेही काम पुढे नेताना फक्त नेता असून भागत नाही. त्यासाठी लढवय्या मावळ्यांची गरज असते. तसे या कामात या यंत्राचे काम असेल. या पालिकेच्या कामात आयुक्तांपासून इतर वरिष्ठ अधिकारी, अभियंते, हे काम करणारी कंपनी आणि कर्मचारीही मावळेच आहेत. पालिका वेळेपूर्वीच हे काम पूर्ण करेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, पालिका आयुक्त इक्‍बालसिंह चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त आयुक्त अश्‍विनी भिडे, लार्सन ऍन्ड ट्युब्रो कंपनीचे उपाध्यक्ष एस. व्ही. देसाई उपस्थित होते. 

प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत 2.07 किलोमीटरचे दोन बोगदे या टप्प्यात बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही बोगद्यांचे काम 18 महिन्यांत पूर्ण होणार आहे. 1995 मध्ये युतीच्या काळात मुंबईत 55 उड्डाणपूल बांधण्यात आले. आता तेही कमी पडू लागले. त्यामुळे हा रस्ता बांधण्यात येणार आहे. 2012 मध्ये या मार्गाचे सादरीकरण केले, तेव्हा अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. आता हे काम सुरू झाले आहे, असेही त्यांनी नमुद केले

Lets win the battle for Mumbais development Trust to Uddhav Thackeray

--------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com