'विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय केला; मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला तरी पाने पुसली जाऊ नयेत': देवेंद्र फडणवीस

तुषार सोनवणे
Wednesday, 30 September 2020

शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. 

मुंबई - राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात परतीच्या पावसामुळे नद्यांना पुर आला होता. पुर आणि अतिवृष्टीमुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. 

सिगरेटसाठी माल आणि हॅश कोडवर्ड, चॅटसंदर्भात दीपिकाची चौकशीत माहिती

विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना मदत करण्याबाबत सरकारकडून उदासिनता दाखवली जात आहे. शेती नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी.  दोन दिवसांपूर्वी संपूर्ण मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपले. यंदा चांगला पाऊस झाल्याने पेरणी क्षेत्रात वाढ होऊन चांगल्या पिकाची अपेक्षा होती. पण या अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झाले आहे. सुपिक माती वाहून गेली आहे. अतिवृष्टी झालेल्या परिसरातील जवळपास 1800 पेक्षा अधिक गावं प्रभावित झाली आहेत. सोयाबीन, कापूस, ऊस कांदा तसेच अन्यही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही तालुक्यांमध्ये तर 70 टक्क्यांच्या वर नुकसान आहे.”

 

विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय केला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नयेत

विदर्भात पूर आला तेव्हाही सरकारकडून मदत करू, अशा घोषणा केल्या गेल्या. पण, केवळ तोंडदेखली मदत करायची म्हणून 16 कोटी रूपयांची मदत केली गेली. त्यानंतर आता कोणतीही मदत केली जात नाही. विदर्भातील पूरग्रस्तांसोबत अन्याय केल्यानंतर आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाऊ नयेत, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी आपल्याला विनंती आहे.”

नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली; मुहूर्त कोणी मांडू नयेत, शिवसेनेचा भाजपवर पलटवार

“केवळ घोषणा करून, पंचनाम्याचे आदेश दिले, असे सांगून चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. बांधावर जाऊन जी मदत आपण जाहीर केली, तशीच ठोस मदत कधीतरी आपल्याला मिळेल, अशी शेतकऱ्यांना आस आहे. निसर्ग चक्रीवादळ, विदर्भातील पूर, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील अतिवृष्टी यात ती मिळू शकली नाही. आता किमान मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तरी द्या, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Letter of Devendra Fadnavis to the Chief Minister for compensation to the farmers