मोटरमनने वाचविले प्रवाशाचे प्राण 

मोटरमनने वाचविले प्रवाशाचे प्राण 

मुंबई : मध्य रेल्वेवरील मोटरमनच्या सतर्कतेमुळे लोकलमधून तोल जाऊन खाली पडलेल्या इडली विक्रेत्याचे प्राण वाचले आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानखुर्द-वाशी स्थानकांदरम्यान मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. 

मानखुर्द येथे राहणारा 19 वर्षाचा चुलबुल कुमार हा इडली विक्रेता आहे. मंगळवारी संध्याकाळच्या वेळी माल डब्याच्या दरवाज्यामध्ये उभा राहुन पनवेल दिशेला प्रवास करीत असताना कुमार याचा तोल जाऊन हा लोकलमधून खाली पडला. त्याचवेळी संध्याकाळी 6 वाजता पनवेल-सीएसएमटी लोकल मानखुर्द स्थानकाच्या दिशेने येत होती. या लोकलचे मोटरमन गुमानी दास यांनी रेल्वे ट्रॅकवर जखमी अवस्थेत पडलेल्या कुमारला पाहिले आणि आपातकालीन ब्रेक लावुन गाडी थांबवली. तसेच घटनेची सुचना आणि माहिता गार्ड आणि मानखुर्द रेल्वे स्थानकातील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली. 

मोटरमन दास आणि गार्ड डी.के.चौरसिया यांनी काही प्रवाशांच्या मदतीने जखमी अवस्थेतील कुमारला मोटरमनच्या मागे असणाऱ्या महिलांच्या डब्यात ठेवले. त्यावेळी मानखुर्द स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांनी स्ट्रेचर आणि रुग्णवाहिका तयार ठेवली होती. लोकल मानखुर्द स्थानकात येताच कुमारला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी रवाना करण्यात आले.

काही दिवसांपूर्वीच सायन-कुर्ला दरम्यान पडलेल्या एका तरुणाचे प्राण देखील एका मोटरमनने वाचविले होते. दरम्यान मोटरमनची सतकर्ता आणि प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव वाचला असल्याने मोटरमन आणि गार्डला रेल्वे प्रशासनातर्फे बक्षिस देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com