खासदारांनी खडसावल्यानंतर अखेर दहिसरला कोरोना रुग्णालय झालं सुरू; २०१५ पासून होतं बंद...  

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी हे 2010 मध्ये आमदार असताना त्यांनी उद्घाटन केलेले दहिसरचे लाईफलाईन रुग्णालय 2015 नंतर बंद पडले. आता कोरोनाच्या काळात तरी निदान ते सुरू करा, असे त्यांनी खडसावल्यानंतर आता महापालिकेने रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई:  उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी हे 2010 मध्ये आमदार असताना त्यांनी उद्घाटन केलेले दहिसरचे लाईफलाईन रुग्णालय 2015 नंतर बंद पडले. आता कोरोनाच्या काळात तरी निदान ते सुरू करा, असे त्यांनी खडसावल्यानंतर आता महापालिकेने रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

 हेही वाचा; सुशांतच्या आत्महत्येच्या केवळ तीन तासांपूर्वी अंकिता लोखंडेनं ठेवलं होतं 'हे' स्टेटस...

दहिसरमध्ये महापालिकेने उभारलेले हे रुग्णालय एका स्वयंसेवी संस्थेला चालवण्यासाठी दिले होते. काही अटींचा भंग झाल्यामुळे ते महापालिकेने 2015 मध्ये परत घेतले. त्यानंतर ते सुरूच झाले नाही व लोकांची गैरसोय देखील वाढत गेली.  

दरम्यानच्या काळात बोरिवलीचे भगवती रुग्णालय देखील धडपणे चालत नव्हते. त्यामुळे लाईफलाईन रुग्णालय सुरू करावे अशी मागणी स्थानिक नगरसेवक हरीश छेडा यांनीही महापालिकेकडे वारंवार केली होती. तरीही महापालिकेने त्याबाबत काही हालचाली न केल्यामुळे छेडा यांनी हे प्रकरण शेट्टी यांच्या निदर्शनास आणले.

हेही वाचा:संजय राऊतांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा; म्हणालेत...

आता कोरोना चा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने महापालिकेने येथे कोरोना रुग्णालय  सुरू करावे. अन्यथा महापालिकेने हे रुग्णालय स्वयंसेवी संस्थांना किंवा राजकीय पक्षांना चालविण्यास द्यावे. अन्यथा आपण हे रुग्णालय स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवू अशी तयारी शेट्टी यांनी दर्शवली. त्यामुळे येथे सोमवारपासून ५० खाटांचे कोरोना रुग्णालय सुरू होत असल्याचे प्रभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी शेट्टी यांना कळवले आहे.

lifeline hospital started in dahisar for corona patients 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lifeline hospital started in dahisar for corona patients