फेरीवाल्यांवरील कारवाईत हलगर्जीपणा; तीन अधिकारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकचा बुधवारी रात्री अचानक पाहणी दौरा केला. प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रात्री अकरानंतरही याठिकाणी फेरीवाल्यांचे बस्तान असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकचा बुधवारी रात्री अचानक पाहणी दौरा केला. प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रात्री अकरानंतरही याठिकाणी फेरीवाल्यांचे बस्तान असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत फ क्षेत्र अधिकारी दीपक शिंदे, क प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार, तसेच फेरीवाला पथकातील कर्मचारी गणेश माने यांच्यावर आयुक्तांनी निलंबनाची कारवाई केली. गुरुवारी (ता.२०) दिवसभर स्कायवॉक परिसर पूर्णपणे मोकळा होता; परंतु कल्याण स्थानक परिसरातील फेरीवाले मात्र ‘जैसे थे’ होते. विविध सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी फेरीवाल्यांबाबत आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. यानंतर आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना रेल्वेस्थानक, तसेच स्कायवॉक परिसर फेरीवाला मुक्त करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशाचे पालन झाले आहे का, याची तपासणी डॉ. सूर्यवंशी यांनी प्रत्यक्ष जाऊन केली.

ही बातमी वाचा ः टंचाईग्रस्तांना जलजीवन
 मात्र रात्री अकरा वाजल्यानंतरही रेल्वेस्थानक, तसेच स्कायवॉकवरील फेरीवाल्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गुरुवारी दोन्ही शहरांतील स्कायवॉकवर पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lightening in the action on the pheriwala; Three officers suspended