टंचाईग्रस्तांना "जलजीवन'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

सरकारने पाणीपुरवठा विभागामार्फत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम ही नळ-पाणीपुरवठा योजना सुरू केली. या योजनेमार्फत जिल्ह्यात 212 कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 124 कामे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ण झाली आहेत. उर्वरित 88 कामे प्रलंबित आहेत.

अलिबागः उन्हाळ्यात दर वर्षी निर्माण होणारी पाणी समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यासाठी गाव कृती आराखड्याचे काम जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यास सुरुवात झाली आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन हे अभियान सुरू केले आहे. अभियानांतर्गत सर्वसामान्यांना पाणी देण्याबरोबरच कौशल्य विकास कार्यक्रमांतील नोंदणीकृतांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

चार वर्षांपासून शवागरात ४६ मृतदेह
 
सरकारने पाणीपुरवठा विभागामार्फत राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम ही नळ-पाणीपुरवठा योजना सुरू केली. या योजनेमार्फत जिल्ह्यात 212 कामांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 124 कामे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागामार्फत पूर्ण झाली आहेत. उर्वरित 88 कामे प्रलंबित आहेत. पाण्याचा प्रश्‍न कायमचा मार्गी लावण्याबरोबरच प्रत्येकाच्या घरात पाणी सहज पोहचले पाहिजे, या दृष्टीने केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमात बदल करून जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. या योजनेंतर्गत ज्या गावे व वाड्यांमध्ये पाण्याचा प्रश्‍न सातत्याने भेडसावत आहे, त्या ठिकाणी या योजना राबविण्याचा प्रयत्न केला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनेतून सुरक्षित व शाश्‍वत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाणी गुणवत्ता कार्यक्रमाला या उपक्रमांमार्फत प्राधान्य दिले जाणार आहे. सांडपाणी व्यवस्था उपक्रम राबविले जाणार आहेत. पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार दिला जाणार आहे. त्यात गवंडी, प्लंबर, इलेक्‍ट्रीशन यांना या योजनेतील देखभाल व दुरुस्तीचे काम मिळणार आहे.
 
जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणी देऊन प्रतिव्यक्ती प्रतिदिन प्रतिमाणसी 55 लिटर पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेमुळे पाण्याचा प्रश्‍न कायमचा सोडविण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. 

जलजीवन मिशन ही योजना नव्याने सुरू करण्यात येणार आहे. या योजनेबाबत गाव पातळीवर कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. हा आराखडा तयार करून पाण्याची समस्या निर्माण होणाऱ्या गावे व वाड्यांची माहिती घेतली जाणार आहे. पाणीपुरवठा कशा पद्धतीने होईल याकडे लक्ष दिले जाईल. 
- संजय वेंगुर्लेकर, 
कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद पाणीपुरवठा 

योजनेवर दृष्टिक्षेप 
- प्रतिव्यक्ती प्रतिदिन प्रतिमाणसी मिळणार 55 लिटर पाणी 
- प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळजोडणी 
- नियमित देखभाल व दुरुस्तीसाठी गावातील प्रशिक्षित मनुष्यबळ 
- पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमातील नोंदणीकृतांना रोजगार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-jal jevan-yojana