
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लायन सफारीमध्ये १४ वर्षांनंतर सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला आहे. लायन सफारीच्या 'मानसी' या मादी सिंहिणीने गुरुवारी रात्री एका छाव्याला जन्म दिला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लायन सफारीसाठी गुजरातमधून आणलेली 'मानस' आणि 'मानसी' ही सिंहाची जोडी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.