esakal | मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी पण...

बोलून बातमी शोधा

Liquor

मद्याच्या होम डिलिव्हरीला परवानगी पण...

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: सातत्याने मुंबईसह राज्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे राज्य सरकार कडक निर्बंध लागू करत आहे. या निर्बंधांमुळे मद्याची दुकाने बंद केली असून हॉटेल आणि बार मधून घरपोच मद्यसेवेची परवानगीसुद्धा अनेक नियम अटीशर्थींसह देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेक बार चालकांनी आपला व्यवसायच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना मद्य विक्री संदर्भातील नवीन आदेश दिले आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहे. त्यामुळे राज्यातील मद्य विक्री करणाऱ्या दुकानातून मद्याच्या विक्रीवर प्रतिबंध लादण्यात आलेत. मात्र रहिवासी सुविधा असलेल्या हॉटेल्समध्ये आणि इतर सर्व उपहारगृह व बारमधून घरपोच सेवा पुरविण्यास परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा: तन्मय फडणवीस मुद्द्यावरून अमृता फडणवीस मैदानात; म्हणाल्या...

भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विदेशी उच्च दर्जाचे मद्य आणि बंद बाटलीतील देशी मद्य सुद्धा घरपोच सेवेतूनच मद्य विक्री करता येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत विक्रीची दुकाने उघडून किंवा पार्सल पद्धतीने दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही. तर मद्य विक्रीच्या दुकानास भेट देता येणार नाही. मात्र, यामध्ये घरपोच मद्य विक्रीची सेवा देण्यासाठी दर 15 दिवसाने मद्य डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. तर मास्कचा वापर, वेळोवेळी हातांचे निर्जंतुकीरण करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना दिल्याने अनेक बार मालकांनी घरपोच मद्य विक्री सेवा सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री उद्या करणार संपूर्ण लॉकडाउनची घोषणा