अडीच वर्षात किती प्रकल्प बाहेर गेले याची यादी जाहीर करणार - उदय सामंत

वेदांता प्रकल्प राज्यात न येता गुजरातला गेला. एकामागोमाग एक प्रकल्प गुजरातला जात आहे. राज्यात मोठे प्रकल्प नाहीत याचे अपयश नक्की कोणाचे
Uday Samant
Uday SamantSakal
Summary

वेदांता प्रकल्प राज्यात न येता गुजरातला गेला. एकामागोमाग एक प्रकल्प गुजरातला जात आहे. राज्यात मोठे प्रकल्प नाहीत याचे अपयश नक्की कोणाचे

डोंबिवली - वेदांता प्रकल्प राज्यात न येता गुजरातला गेला. एकामागोमाग एक प्रकल्प गुजरातला जात आहे. राज्यात मोठे प्रकल्प नाहीत याचे अपयश नक्की कोणाचे यावर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा नवीन सरकारला मुक्तहस्ते काम करू दिले पाहिजे. किती प्रकल्प अडीच वर्षात गेले याची यादी दोन दिवसांत जाहीर करणार असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डोंबिवलीत केला.

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट यांच्या वतीने इंजिनिअर डे निमित्त उद्योजकीय परिषदेचे आयोजन येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात करण्यात आले होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, मराठी उद्योजक हनुमंत गायकवाड, एमआयडीसी सीईओ डॉ. पी. अलबंगन, सतीश पाटील, डॉ. अजित मराठे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मराठी उदोजकांनी यावेळी एमआयडीसी आणि सरकारने उदोजकांना सहकार्य केले पाहिजे अशी मागणी मंत्री सामंत यांच्याकडे केली असता त्यावर सामंत यांनी मराठी उद्योजकांना एमआयडीसी आणि राज्य सरकारकडून कशी ताकद देता येईल याचा जीआर काढणार आहे. मराठी उद्योजकांनी अनेक मागण्या केल्या आहेत त्यांचा सकारात्मक विचार करू. त्याची एक समिती नेमली जाईल व त्यांना पूर्ण पाठिंबा दिला जाईल असे सांगितले.

तसेच मराठी उद्योजकांना पूर्ण पाठिंबा देणार असे मुख्यमंत्री कार्यक्रमाला न येता सांगत असतील. तुम्ही जो शब्द द्याल तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असे जर मुख्यमंत्री बोलत असतील तर मला सांगा शिंदे साहेबांनी केलेला उद्योग चांगला होता की वाईट होता असे बोलतच एकच हशा पिकला. एखाद्या मंत्र्याला वाटायला लागलं की मीच शहाणा आहे तर सगळ्यांचं वाटुळ होते असा टोला त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

जे उद्योजकांना मोठे करण्यासाठी, युवा पिढीला आनंद देण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत, ते मराठी उद्योजक हणमंत राव गायकवाड यांच्याशी कसे वागले? ते कधी तरी प्रेस घेऊन सांगा म्हणजे कळेल की खायचे दात कसे आहेत? आणि दाखवायचे दात कसे आहेत असा सल्ला त्यांनी उपस्थित गायकवाड यांना दिला. येत्या 15 दिवसांत मराठी उद्योजकांना उभारी देण्यासाठी थिंक टँक बनविले जातील. केवळ आमच्या चेंबर मध्ये या असे काही होणार नाही. तर दुसरीकडे मराठी उदोजकांची तब्येत बिघडेल असे आमच्याकडून किंवा अधिकाऱ्याकडून काही होणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी उद्योजकांना दिला.

वेदांताच्या पार्श्वभूमीवर एक संकल्प केला गेला आहे की मोठे प्रोजेक्ट राज्यात आलेच पाहिजे त्यात दुमत नाही. काही दिवसांत असा प्रोजेक्ट येईल देखील. कालच आपल्याला जर्मनीचे एक शिष्य मंडळ भेटले. त्या उद्योग वाढीतूनही लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. वर्षभरात दीड लाख नोकऱ्या आम्ही उपलब्ध करू असा संकल्प आम्ही केला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

डोंबिवली एमआयडीसिमध्ये प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे यावर सामंत म्हणाले, ठाणे, तळोजा, डोंबिवली एमआयडीसी परिसराचा सात ते आठ दिवसांत पाहणी केली जाणार आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची कामे कशी झालीत याचा आढावा घेणार आहे. प्रदूषण होऊ नये याविषयी त्यांना सूचना करु. त्यानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर भविष्यात कायद्यात जी तरतुद आहे ती कारवाई करू असा इशारा त्यांनी रासायनिक कंपन्यांना दिला आहे.

ठाकरे सरकारच्या काळात डोंबिवलीतील 156 रासायनिक कारखाने स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला होता. यावर ते म्हणाले, त्याबद्दल सविस्तर बैठक घेणं गरजेचं आहे. येथील संस्थांशी चर्चा करूनच तत्कालीन मुख्यमंत्री नी निर्णय घेतला होता त्याच काय करायचं हे पाहू.

मुख्यमंत्री यांच्या नावाने रोजगार योजना आहे. त्याची प्रकरण जी बँक मध्ये जातात. तेव्हा अनेक उद्योजकांचे रिजेक्शन केले जाते. त्यावर झिरो रिजेक्शनवर त्यांची प्रकरण मंजूर करावी अशी मी बैठक घेतली होती. युवा पिढीचा छळ होऊ नये ही त्यामागची भूमिका होती. जाणीवपूर्वक जर कोणी अस करत असेल ते कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मंत्री सामंत यांनी बँकांना दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com