मुंबईकरांनो राज्यात मान्सून दाखल झालाय, पण मुंबईत कधी दाखल होणार जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

राज्यात मध्यरात्री पासून मान्सूनच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. उकाड्याने हैराणा झालेल्या नागरिकांना मान्सूनने दमदार हजेरी लावत दिलासा दिला

मुंबई : राज्यात मध्यरात्री पासून मान्सूनच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनने दमदार हजेरी लावत दिलासा दिला. राज्यामध्ये मान्सूनचे आगमन झाले अशी माहिती भारतीय हवामान विभागने दिली. मान्सूनच्या आगमानाने बळीराजा सुखावला आहे. राज्यभरात हरणे, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये मान्सूनने हजेरी लावली. या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या 48 तासाच मान्सून सर्वदूर जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असून मुंबईतसह उर्वरित ठिकाणी मान्सून दाखल होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागने दिली. 

मोठी बातमी -  मुंबईत 'या' क्षेत्रांवर झाला लॉकडाऊनचा सर्वाधिक परिणाम...

मुंबईत मान्सून पूर्व सरींनी हजेरी लावली. दोन दिवसांनी सकाळ सकाळ पावसाच्या सरींनी मुंबईकर सुखावले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्याने मुंबईकर कामावर जाण्यासाठी बाहेर पडत आहे. सकाळी कामाला जाणाच्या वेळेस मुंबईत पावासाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांची काहीशी तारांबळ उडाली. तर दुसरीकडे बऱ्याच दिवसांनी निसर्गाच्या सानिध्यात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांनी पावसाचा आनंद घेतला.

येत्या 48 तासात मुंबईत मान्सून दाखल होणार आहे. या दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी जोरदार वारे वाहणार असून मध्यम ते जाोरदार  पाऊस पडण्याची  शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली. गुरुवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. ठाण्यामध्ये देखील दुपारी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. कुलाबा येथे कमाल तापमान 33 अंश सेल्सियस तर सांताक्रुझ येथे 33.7अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.  

मोठी बातमी -   पालघर साधू  हत्या प्रकरण: सुप्रीम कोर्टानं बजावली राज्य सरकारला नोटीस....

दरम्यान येत्या 48 तासात मान्सून पुढे सरकण्यासाठी स्थिती अनुकूल आहे. उर्वरित ठिकाणी मान्सून दाखल होईल. या दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे उपसंलाचलक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. 

येत्या 24 तासात पालघर, मुंबई, ठाणे येथील काही ठिकाणी  ढगांच्या गडगडाट व विजेच्या कडकडाटसह पाऊस पडणार असून ताशी 30 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 13 व 14 जून रोजी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

monsoon reached in maharashtra withing 48 hours monsoon will reach to mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monsoon reached in maharashtra withing 48 hours monsoon will reach to mumbai