बच्चे कंपनीची पब्जी पिचकारीला पसंती!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

होळी, धूलिवंदनाचा सण जवळ आल्याने नव्या पब्जी पिचकारी आणि होळीच्या रंगांनी बाजारपेठ रंगली आहे. रंगपंचमीनिमित्त लहान मुलांच्या पिचकारी खरेदीकरिता ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. 

नवी मुंबई : होळी, धूलिवंदनाचा सण जवळ आल्याने नव्या पब्जी पिचकारी आणि होळीच्या रंगांनी बाजारपेठ रंगली आहे. रंगपंचमीनिमित्त लहान मुलांच्या पिचकारी खरेदीकरिता ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. 

ही बातमी वाचली का? राजकन्या भाग्यश्रीचा नवी अविष्कार

वाशीतील घाऊक बाजारपेठ विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, लहानग्यांचे आकर्षण असणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकऱ्यांनी फुलली आहे. या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची व लहानग्यांची झुंबड उडाली आहे. येथील बाजारात स्वस्त दरात वस्तू मिळत असल्याने नवी मुंबईसह, मुंबई उपनगरातील ग्राहक या ठिकाणी मोठ्या संख्येने खरेदीसाठी येत आहेत. बाजारात रंगांचे, पिचकाऱ्यांचे दर तेवढेच असून, नैसर्गिक रंगाला अधिक मागणी आहे. नैसर्गिक सुके रंग 80 ते 100 रुपये; तर ओले रंग 180 रुपये दरात उपलब्ध आहेत. नैसर्गिक रंगांबरोबरच विविधरंगी फवारेदेखील उपलब्ध असून, त्यांचा दर 60 ते 100 रुपये इतका आहे. 190 ते 500 रुपयांपर्यंत बाजारात विविध प्रकारच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून, यामध्ये विविध कार्टून्सच्या पिचकाऱ्यांना लहान मुले पसंती दर्शवत आहे. यंदा मात्र, पब्जी या खेळाची पिचकारी उपलब्ध आहे. त्याचबरोबर सैन्य दलातील बुंदकीसारखी असणारी पिचकारीदेखील उपलब्ध आहे. याशिवाय गुजराती ड्रमची पिचकारी उपलब्ध असून, विविध प्रकारच्या पिचकारी 80 ते 600 रुपयांना; तर पब्जी पिचकारी 190 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. 

ही बातमी वाचली का? आदित्य ठाकरेंच्या लग्नालाही सरकार स्थगिती देईल

सध्या बाजारात होळीनिमित्त रंग, पिचकारी खरेदीला ग्राहकांची लगबग सुरू असून, ग्राहक नैसर्गिक रंगांना अधिक पसंती देत आहेत. त्याचबरोबर लहान मुले पब्जी पिचकारीची मागणी करीत असतात. दररोज 30 ते 40 पब्जी पिचकाऱ्यांची विक्री होते. 
-महेंद्र राजपूत, विक्रेता. 

प्रकारानुसार दर 

  • पिचकारी व किंमत 
  • पब्जी पिचकरी 190 ते 500 
  • युनिकोन 300 ते 400 
  • गुजराती ड्रम 200 ते 400 
  • छत्रीवाली पिचकरी 150 ते 200 
  • मछलीवाली पिचकरी 20 ते 50 
  • तटालीम टॉम 50 ते 100 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: little boys girls likes to pabbi spray!