crime
ESakal
- नितीन बिनेकर
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणाचा तपास करताना अवघ्या १४ तासांत चिमुरडीचा शोध घेण्यात सीएसएमटी लोहमार्ग पोलिसांना यश आले. याप्रकरणी पूजा शिंदे (वय २३, रा. सायन कोळीवाडा ) या महिलेला अटक करण्यात आली आहे. चिमुरडीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले असून, आरोपी महिला सध्या पोलीस कोठडीत आहे.