

Broadcast closed to general public and journalists
ESakal
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या धर्तीवर मुंबई उच्च न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. न्यायालयीन कामकाज कसे चालते आणि न्यायालयीन कामाप्रती पारदर्शकता वाढावी म्हणून काही महिन्यांपूर्वी थेट प्रक्षेपण सुरू झाले होते. तथापि न्यायालयीन कामकाजाच्या हेतूत: संपादित केलेले व्हिडिओ समाजमाध्यमावरून प्रसिद्ध करण्याच्या घटना वारंवार वाढल्यानंतर थेट प्रक्षेपण बंद करण्यात आले. सुनावणीचे प्रक्षेपण न्यायमूर्तींच्या मंजुरीनुसार होणार, असे उच्च न्यायालय प्रशासनाने मागील महिन्यात सार्वजनिक नोटिसीद्वारे स्पष्ट केले. परिणामी, मुख्य न्यायमूर्तींसह अनेक महत्त्वाची खंडपीठ आणि एकलपीठांनी न्यायालयातील सुनावणीचे थेट प्रक्षेपण बंद करून निव्वळ वकिलांसाठी सुरू ठेवले आहे.