दारुड्या पतीला कंटाळून भंगार डिलर शोधला, पण त्याने अंगावर ओतलं... 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 January 2020

लिव्ह-इन-पार्टनर म्हणून सोबत राहणाऱ्या महिलेला मद्यधुंद अवस्थेत रॉकेल टाकून जिवंत जाळणाऱ्या तरुणाला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. रामआश्रय उर्फ राजू पाल (30) रा.कळवा असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा निकाल मुख्य न्यायमूर्ती आर.एम.जोशी यांनी सोमवारी दिला असून सरकारी वकील म्हणून उज्वला मोहोळकर यांनी काम पाहिले.

कळवा येथे राहणाऱ्या विवाहित भंगार वेचक महिलेला चार मुले असून, दारुड्या पतीच्या दररोजच्या जाचाला कंटाळून सहा महिन्यापूर्वीच ती कळवा येथील जयभीमनगरमध्ये राहण्यास गेली होती. कालांतराने तिचा संपर्क भंगाराच्या व्यवसायातील भंगार डीलर रामआश्रय उर्फ राजू याच्याशी आल्याने ती त्याच्यासोबत लिव्ह-इन-पार्टनर म्हणून राहत होती.

मोठी बातमी - अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यात खुर्चीवरून खटके ?

रामआश्रयने सुरु केला शिवीगाळ 

6 जून 2017 रोजी रामआश्रय हा मद्यधुंद होऊन घरी आला. आणि आपल्या पार्टनर महिलेसोबत भांडणे करू लागला. नशेच्या अंमलाखाली असलेल्या रामआश्रय याने स्वंयपाक घरात काम करीत असतानाच तिला शिवीगाळी सुरु केली.तसेच, रागाच्या भरात तिच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत पेटवून दिले. आगीच्या कल्लोळाने शेजारी-पाजारी धावून येताच रामआश्रयने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महिला 70 टक्के भाजली असल्याने दोन दिवसांच्या उपचारानंतर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.

मोठी बातमी - तनुश्री दत्ता म्हणते नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम...

जन्मठेपेची शिक्षा आणि 1 हजाराचा दंड

सदर खटल्याची अंतिम सुनावणी न्या.जोशी यांच्या न्यायलयात सुरु होती. या खटल्यात सरकारी वकील उज्वला मोहोळकर यांनी न्यायलयात मृतकाची मृत्युपूर्व जबानी आणि वैद्यकीय अहवाल सादर केला. त्यानुसार,न्यायमूर्तीनी रामआश्रय याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि 1 हजाराचा दंड ठोठावला.  

WebTitle : live in partner killed his female partner in thane court sentenced life imprisonment

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: live in partner killed his female partner in thane court sentenced life imprisonment