esakal | अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यात खुर्चीवरून खटके ?
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यात खुर्चीवरून खटके ?

अशोक चव्हाण आणि छगन भुजबळ यांच्यात खुर्चीवरून खटके ?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसंस्था

महाराष्ट्रात ३० डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. महाविकास आघाडीच्या ३६ मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या काही नेत्यांकडून खातेवाटपाबाबत नाराजीचा सूर उमटताना पाहायला मिळला. काही वाद मिटले, काही अजूनही मिटलेले नाहीत असं सध्या महाविकास आघाडीच्या मंत्र्यांबद्दल बोललं तर वावगं ठरू नये. आज मंत्रिमंडळ विस्तारानंतरची पहिलीच बैठक घेण्यात आली. आधीच खातेवाटपावरून महाविकास आघाडीतील तीनही पक्षात कुरबुरी आहेत. अशात आजच्या  बैठकीत विजय वडेट्टीवार यांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं.

खुर्चीचा खेळ सारा :

आज मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर सर्व मंत्र्यांची पहीलीच बैठक पार पडतेय. या बैठकीत कोणत्या खुर्चीवर कोण बसणार? यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या वाद झाल्याची चर्चा आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिलीये.  

मोठी बातमी - 'त्या' जाहिरातीनंतर शिवप्रेमींकडून अक्षय कुमारची 'धुलाई  

त्याचं झालं असं की, मंत्रिमंडळ विस्तारानंतरची आज पहिलीच बैठक पार पडतेय. या आधी प्रत्येकी दोन असे सहा मंत्री मंत्रिमंडळात होते. यामध्ये छगन भुजबळ हे आधीपासूनच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित असायचे. दरम्यान, विस्तारानंतर आता मंत्र्यांची संख्या वाढली आहे. तीनही पक्षांचे अनेक मंत्री आता मंत्रिमंडळात आहेत.  अशात टीव्ही रिपोर्टच्या माहितीनुसार काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे छगन भुजबळ यांच्या खुर्चीत येऊन बसलेत. यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवला.

आधी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराजी. त्यानंतर खातेवाटपावरून नाराजी, त्यानंतर चांगलं खातं न मिळाल्याने नाराजी आणि आता तर चक्क बसायच्या जागेवरून कुरबुर. त्यामुळे नक्की महाविकास आघाडीचं चाललंय तरी काय? असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करतोय. ज्यावेळी खातेवाटपाची चर्चा सुरु होती तेंव्हा देखील अजित पवार आणि अशोक चव्हाण यांच्यात खटके उडाल्याचे बातमी समोर आली होती. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावावरून हे खटके उडालेले होते. 

मोठी बातमी - पोलिसाच्या धाकाने सई ताम्हणकरने गायलं गाणं..

थोड्यावेळानी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक संपल्यानंतर याबाबत अधिक माहिती समोर येईलच. मात्र एका मराठी वृत्तवाहिनीच्या माहितीच्या आधारे राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ आणि काँग्रेच्या अशोक चव्हाण यांच्यात खुर्ची वरून खटके उडाल्याची चर्चा आहे.

WebTitle : quarrel between ashok chawan and chagan bhujbal over seating arrangement if cabinet meeting