जुईनगरमधील वृद्धाला जीवदान

जुईनगरमधील वृद्धाला जीवदान
जुईनगरमधील वृद्धाला जीवदान

नवी मुंबई : आधुनिक जीवनशैलीमध्ये किडनीच्या (मूत्रपिंड) समस्या लोकांमध्ये जलद वाढत आहेत. जुईनगर येथे राहणारे कांतीलाल तनेजा (वय ७७) यांची पाच वर्षांपूर्वी जंतुसंसर्गामुळे एक किडनी काढण्यात आली होती. अशातच गेल्या आठवड्यात मूतखडा झाल्याचे निदान झाले व त्यांची लघवी बंद झाली. त्यामुळे एकच किडनी असलेल्या या ज्येष्ठ नागरिकाला जीवदान देण्यात नेरूळ येथील एका खासगी हॉस्पिटलला यश आले आहे. 

कांतीलाल तनेजा यांना मूतखडा झाल्याने आपत्कालीन स्थितीमध्ये नेरूळ येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी मिनी पर्कुटेनियस नेफ्रोलिथोटोमी म्हणजेच अगदी छोटा होल करून स्कोपीद्वारे हा मूतखडा काढून टाकला. त्यामुळे पुढील २४ तासांमध्ये त्यांच्या किडनीचे आरोग्य पूर्ववत झाले. ही प्रक्रिया वेळेवर झाली नसती तर कदाचित त्यांना डायलिसिसची आवश्‍यकता भासली असती. रक्तस्राव न करता अथवा किडनीतील कोणतेही टिशू नष्ट न करता ही वैद्यकीय प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. 

‘कांतीलाल यांच्या शरीरात असलेल्या एकाच किडनीमध्ये १ सेमी मूतखडा व जंतुसंसर्ग झाल्याने किडनीचे कार्य पूर्णपणे बंद झाले होते. किडनीला कमी दुखापत करून हा मूतखडा काढणे हे एक वैद्यकीय आव्हान असते. 
-डॉ. निशांत काठाळे, मूत्रविकारतज्ज्ञ. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com