लोकल प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक

लोकल प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक
लोकल प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्यास अटक

नवी मुंबई : गर्दीचा फायदा घेत रबाळे रेल्वेस्थानकात लोकलमधील प्रवाशाचा मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्याला वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केली. फारुख सालेमोहम्मद आरबानी (३३) असे या सराईत चोरट्याचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला. 

आरोपी फारुखने मंगळवारी (ता.१२) सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास रबाळे रेल्वेस्थानकातून ठाण्याला जाणाऱ्या प्रतीक घोडेकर या तरुणाच्या खिशातील ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल लांबवला. मात्र, मोबाईल घेऊन स्थानकातून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना त्या ठिकाणी तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याबाबत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता त्याने लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून चोरीचा मोबाईल हस्तगत केला. आरोपी फारुख अरबानी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्या विरोधात मोबाईल चोरीचे १४ गुन्हे दाखल असून, त्याला यापूर्वी मोबाईल चोरीच्या गुह्यात अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com