लोकलमधील "टपोरी' घटले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

मुंबई - लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या "टपोरीं'ची संख्या कमी झाली आहे. लोकलच्या टपावरून प्रवास करताना ओव्हरहेड वायरमुळे विजेचा धक्का लागून 11 महिन्यांत 20 जणांचा मृत्यू झाला होता. मध्य रेल्वेवर 17 आणि पश्‍चिम रेल्वेवर तिघांनी जीव गमावला होता. अशा घटनांत पाच वर्षांत 150 जण मृत्युमुखी पडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. पोलिसांच्या कारवाईमुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी लोकलच्या छतावरील स्टंटबाजांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. या वर्षातील 11 महिन्यांत 20 जण मृत्युमुखी पडले; त्यांच्यात मध्य रेल्वेवरील 17 आणि पश्‍चिम रेल्वेवरील तिघांचा समावेश होता.
Web Title: Local Tapori