Mumbai News: रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला, उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान विचित्र प्रकार; नेमकं काय घडलं?

Ulhasnagar-Ambernath Railway: उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान रेल्वे रुळावर लोखंडी बॉक्स आढळला. सुदैवाने, मोटरमनने हा प्रकार पाहताच सतर्कतेमुळे अपघात टळल्याची माहिती समोर आली आहे.
Iron box found on railway tracks

Iron box found on railway tracks

ESakal

Updated on

मुंबई : उल्हासनगर अंबरनाथ रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांच्या मधोमध लोखंडी बॉक्स ठेवलेला आढळल्याने एकच खळबळ उडाली. हा बॉक्स कर्जतकडे जाणाऱ्या ट्रॅकवर ठेवण्यात आला होता. सुदैवाने, लोकल ट्रेनचे मोटरमनने हा प्रकार पाहताच लोको पायलटने त्वरित लोकल थांबवली. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com