mumbai local journey passenger
sakal
- नितीन बिनेकर
मुंबई - मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेतील वाढती गर्दी आता कोणत्या टोकाला पोहोचली आहे, याचे धक्कादायक उदाहरण विरार-वांद्रे लोकलमध्ये पाहायला मिळाले. वयाच्या उत्तरार्धात आरामदायी प्रवासाची अपेक्षा असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला बसण्यासाठी जागा मिळत नसल्याने चक्क दोरी आणि लाकडाच्या सहाय्याने तयार केलेला पाळणा डब्यात बांधून त्यावर बसून प्रवास करावा लागल्याचे समोर आले आहे. या प्रवाशाचा फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून रेल्वेतील गर्दीच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.