

Mumbai Local Megablock
ESakal
मुंबई : उपनगरीय लोकल मार्गावर तांत्रिक बिघाड दुरुस्ती कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर हा ब्लॉक घेणार येणार असून यावेळी अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. तर मेगाब्लॉक काळात गाड्या विलंबाने धावणार असून परिणामी प्रवाशांचे हाल होणार असल्याची शक्यता आहे. यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.