Local Train Mumbai | सर्वसामान्यांसाठी लोकल अद्याप नाहीच; बुधवारी पुन्हा बैठक होणार

कुलदीप घायवट
Tuesday, 12 January 2021

सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांकडे दुर्लक्ष केले जात आहे. लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास सरकारविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, अशी भूमिका रेल्वे प्रवासी संघटनेने घेतली आहे. 

मुंबई  : गेल्या दहा महिन्यांपासून सर्वसामान्य प्रवाशांचा लोकल प्रवास बंद आहे. राज्य सरकारतर्फे मंगळवारी (ता. 12) सरसकट सर्व प्रवाशांसाठी लोकल सोडण्याबाबतचा निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, तो पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. आता बुधवारी (ता. 13) राज्य सरकारकडून कॅबिनेट बैठकीत निर्णय होण्याची शक्‍यता आहे. 

दरम्यान, सरकारकडून सर्वसामान्य प्रवाशांकडे दुर्लक्ष केले जात आहे. लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास सरकारविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, अशी भूमिका रेल्वे प्रवासी संघटनेने घेतली आहे. 
राज्य सरकारकडून अत्यावश्‍यक आणि विशेष सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. महिलांना सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7 ते शेवटच्या लोकलपर्यंत प्रवासाची परवानगी आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासाबद्दल तारीख-पे-तारीख देण्यात येत आहे. परिणामी, रेल्वे प्रवासी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. 

मुंबई, परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

गेल्या महिन्यापासून राज्य सरकारकडून सामान्य मुंबईकरांना प्रवासाची मुभा मिळण्याचे संकेत देण्यात येत होते. मात्र, गर्दीच्या नियोजनाबाबतचा प्रश्‍न प्रलंबित राहिला होता. परंतु, आता महिलांना पूर्णवेळ आणि उर्वरित प्रवाशांना गर्दीची वेळ वगळता लोकलने प्रवास करण्याची अनुमती देण्याची शक्‍यता आहे. 

 

असा होऊ शकतो निर्णय 

  • - सर्वसामान्य प्रवाशांना रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत प्रवासाची मुभा 
  • - सकाळी 11 ते दुपारी 3 आणि सायंकाळी 7 किंवा रात्री 8 च्या नंतर प्रवासाची मुभा 
  • - दुपारी 12 ते 4 आणि रात्री 8 नंतर मुभा 
  • - महिलांसाठी पूर्ण वेळ प्रवासाची परवानगी 

Local Train Mumbai Not yet lto the general public The meeting will be held again on Wednesday

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local Train Mumbai Not yet lto the general public The meeting will be held again on Wednesday