Mumbai Rain: मुंबईत संततधार! रेल्वे सेवा विस्कळीत, अडकलेल्या प्रवाशांना पालिकेचा मदतीचा हात

Monsoon Update: मुंबईत कोसळणाऱ्या अतिमुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेला बसला आहे. अनेक प्रवासी विविध स्थानकांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे.
Mumbai Rain update
Mumbai Rain updateESakal
Updated on

मुंबई : मुंबईवर कोसळणाऱ्या अतिमुसळधार पावसाचा फटका उपनगरीय रेल्वे सेवेला बसला आहे. मध्य आणि पश्चिम उपनगरांतील रेल्वे वाहतूक मंदावल्याने तसेच काही गाड्या उशिराने धावत असल्याने अनेक प्रवासी विविध स्थानकांवर अडकून पडले आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या या प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन महानगरपालिकेकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. शहरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना पिण्याचे पाणी, चहा, बिस्कीट आणि इतर खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com