आधी मारलं, ओरबडलं नंतर चावा घेऊन पळाली, महिला प्रवाशाचा टीसीवर हल्ला, अंधेरी स्थानकात धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?

Andheri Railway Station Incident: मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकात विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशाने महिला तिकीट तपासनीसावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
Women Passenger attacks on Female TC

Women Passenger attacks on Female TC

ESakal

Updated on: 

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या महिलेला ५१० रुपये दंड भरण्यास सांगितल्याने तिने महिला तिकीट तपासनीसावर (टीसी) हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ४) अंधेरी रेल्वे स्थानकात घडली. संबंधित महिलेने टीसीला ओरखडे काढून चावा घेतला. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. हरप्रीत कौर (वय ४२) असे जखमी टीसीचे नाव आहे.

Loading content, please wait...